दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो! १० मिनिटे जरी उशीर कराल तरी वर्ष वाया जाईल!

    02-Feb-2023
Total Views |
exam


मुंबई : दहावी-बारावीच्या परिक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षामध्ये परीक्षा केंद्रांवर १० मिनिटे उशीर झाला तर तो ग्राह्य धरला जात होता. मात्र, आता जर उशीर झाला तर केंद्रात प्रवेश न देण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. त्यामुळे वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. उशीर झाल्यास त्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परिक्षा लवकरच २१ फेब्रुवारी टे २५ मार्चच्या दरम्यान आहेत. अशा परिस्थितीत बोर्डाने परिपत्रक जाहिर केलेले आहे. या परिपत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षामध्ये असणारा परिक्षा कालावधी हा ११ ते ३ असा नियोजित करण्यात आला आहे. मात्र,आता जर उशीर झाला तर केंद्रात प्रवेश न देण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. त्यामुळे परिक्षा केंद्रावर वेळेच्या आधी येणे विद्यार्थ्यांना क्रमप्राप्त आहे.