कोकणात मविआला धक्का! भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

    02-Feb-2023
Total Views |


कोकणात मविआला धक्का! भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय
 
मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध बाळाराम पाटील यांच्यात चुरशीची लढत सुरु होती. महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे असताना भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजारापेक्षा जास्त मते मिळवुन विजय निश्चित केला आहे. म्हात्रे यांना एकूण मतांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे कोकणात शेकापला मोठा धक्का मिळाला आहे.
 
बाळाराम पाटील यांनी पराभव स्वीकारला असुन त्यांना ९ हजार ७०० मते मिळाली आहेत. कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर होते. म्हात्रे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेत पहिल्या फेरीत एकूण 22 हजार मते मिळवली आहेत. त्यांना 60 टक्के तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 40 टक्के मतदान मिळाले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.