स्त्रीचा अपमान करणारा मनुष्य पुन्हा कधीही उठू शकणार नाही ! - कंगना रनौत

    18-Feb-2023
Total Views |
 

uddhav 
मुंबई : चिन्ह आणि नावाचा निवाडा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गलितगात्र अशा अवस्थेत आहेत. त्यांच्या या परिस्थितीवर अभिनेत्री कंगना रनौत हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. कुकर्म करणारे देवही स्वर्गातून खाली पडतात असे ती म्हणाली.
आपल्या ट्विटर हॅन्डलरवरून प्रतरिक्रिया देत कंगना म्हणाली, "वाईट कर्म करणाऱ्या देवतांचे राजा इंद्र देवही स्वर्गातून खाली पडतात. हे तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्याने अन्यायाने माझे घर तोडले होते,तेव्हाच मला समजले होते की हे लवकरच पडणार. चांगले कार्य केल्याने देवता पुन्हा उठू शकतात. पण स्त्रीचा अपमान करणारी नीच माणसं कधीच उठू शकत नाहीत. हे आता केव्हाच उठू शकणार नाहीत."