छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा ऑस्करमध्ये प्रवेश!

    09-Dec-2023
Total Views |

hina khan
 
मुंबई : हिंदी मालिकेतून भूमिका साकारत चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणी अभिनेत्री हिना खान हिने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. आपल्या अभिनयाची मोहोर परदेशात उमटवण्यासाठी हिना सज्ज झाली असून तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटाला २०२४ ऑस्करचे नामांकम मिळाले आहे.
हिना खान हिने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. “पुरस्कारांच्या जगात, सर्वात प्रतिष्ठित ऑस्करच्या शर्यतीत धावणं खूप खास आहे, आम्ही थोडे दूर असलो तरी खूप जवळ आहोत, जिंकण्याची आशा आहे कारण आम्ही नामांकनापर्यंत पोहोचलो आहोत. थोडेसे आमच्या स्वप्नाच्या जवळ. आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळत देत रहा, जेणेकरून आमचे स्वप्न पूर्ण होईल”.

hina khan 
 
दरम्यान, 'कंट्री ऑफ ब्लाइंड' चित्रपटाचे कथानक ध व्यक्तींच्या जीवनावर आणि त्यांच्या अडचणींवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रहबत शाह काझमी यांनी केले आहे. या चित्रपटात हिना खान, शोएब निक, मीर सरवर, अनुष्का सेन, इनामुलहक, अहमर हैदर, प्रद्युमन, नमिता लाल, हुसैन खान, जितेंद्र राय, राहत शाह काझमी, ज्युलियन सीझर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.