‘अॅनिमल’ चित्रपटाने आठ दिवसांत ३६१ कोटींची केली विक्रमी कमाई
09-Dec-2023
Total Views |
मुंबई : या वर्षात हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीने रसिक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. २०२३ या वर्षात अभिनेता रणबीर कपूर याचा सर्वाधिक गाजलेला आणि चाललेला असा 'अॅनिमल' हाच चित्रपट ठरला. चित्रपटाचे कथानक हे केवळ वडिल-मुलाभोवती जरी फिरत असले तरी यात अति रक्तरंजितपणा दाखवला आहे हे डावलून चालणार नाही. मात्र, असे असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला देशभरातच नाही तर जगभरात भरघोस प्रतिसाद दिला आहे. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने ८ दिवसांत ३६१ कोटींचा टप्पा गाठला आहे.
'अॅनिमल' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ६३.८ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी, तिसऱ्या दिवशी ७१.४६ कोटी, चौथ्या दिवशी ४३.९६ कोटी, पाचव्या दिवशी ३७.४७ कोटी, सहाव्या दिवशी ३०.३९ कोटी, सातव्या दिवशी २४.२३ कोटी आणि आठव्या दिवशी २३.५० कोटींची कमाई करत एकूण कमी ३६१.०८ कोटींचा गल्ला जमवला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ति कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.