काँग्रेस खासदाराच्या घरात सापडलं करोडो रुपयाच्या नोटांचं घबाड!

    09-Dec-2023
Total Views |
 

Dheeraj Prasad Sahu
 
 
रांचीः काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर आयकर विभागाची छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. धीरज साहू यांच्याशी संबंधित ओडिशा आणि झारखंडमधील अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेली रोकड, दागिने आणि इतर मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ठिकाणांहून 300 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे, जी मोजण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील.
 

Dheeraj Prasad Sahu 
 
विभागाने बुधवारी ओडिशातील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. यात बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचाही समावेश आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर आणि त्याच्या निवासस्थानावर छापे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेली 30 शेल्फ्स आढळून आली आहेत. एकूण 176 बॅग रोकड ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी 40 पोत्यांमध्ये ठेवलेल्या नोटांची मोजणी पूर्ण झाली आहे. ज्यामध्ये 50 कोटींहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. तर उर्वरित नोटांच्या मोजणीला आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत म्हटलं की, ‘जनतेकडून जे लुटलं गेलं त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल.’ पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
 
 
 
धीरज साहू त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी!
 
चार दिवस उलटून गेले तरी धीरज साहू किंवा त्यांच्या कंपनीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी धीरज साहू अजूनही दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत आहे. साहू यांचा मोबाईल सध्या बंद असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यांच्या सहकाऱ्याशी संपर्क साधला असता, धीरज साहू हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ते दिल्लीतील राज्यसभेच्या खासदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सरकारी निवासस्थानी नसून त्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी आहेत.