नीलम गोऱ्हेंचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरेंची पोलखोल! सगळंच सांगितलं..
08-Dec-2023
Total Views |
नागपुर : "संजय राऊत यांचा उबाठा गटाच्या पक्ष श्रेष्ठींनी बळीचा बकरा केला" अस वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नागपुर येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की संजय राउत साहेंबासोबत माझे वैचारिक मतभेद आहेत, त्याची आक्रमक भाषा मला आवडत नाही. तरीही मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी त्यांना ते जेल मधुन आल्यावर सांगितले होते की तुम्ही येवढ्या टोकाच्या भुमिका घेत जाऊ नका". यावर संजय राउतांनी "माझ आयुष्य मी समर्पित केलं आहे, मी असच बोलणार अस म्हटल्याच ही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मी फक्त सांगण्याच काम केलं. पण त्याची वक्तव्ये पक्षश्रेष्ठींना आवडणारी होती. त्यांना स्वत: आपल्या तोंडुन जे बोलता येत नव्हतं ते त्याच्या तोंडुन बोलल जात होत. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी संजय राऊत यांचा बळीचा बकरा केला अस नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या विभाजनानंतरही नीलम गोऱ्हे उबाठा गटात होत्या. उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांनपैकी एक अशी त्यांची ओळख होती काही महीन्यांपुर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होत्या.