काँग्रेसच्या खासदाराकडे सापडली २०० कोटींची रोकड; मोदींनी ट्विट करत साधला निशाना
08-Dec-2023
Total Views | 175
नवी दिल्ली : "देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या नेत्यांचे प्रामाणिकपणाचे 'भाषण' ऐकावे. जनतेकडून जे काही लुटले गेले आहे, त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची गॅरंटी आहे." असा आशयाचे ट्विट करत मोदींनी काँग्रेस पक्षासह विरोधकांवर निशाना साधला आहे.
देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के 'भाषणों' को सुनें... 😂😂😂
जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है।
काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत आयकर विभागाने २०० कोटींची रोकड जप्त केली असल्याचा दावा करण्यात येत आहे. साहूंशी संबंधित तीन राज्यांतील सहा ठिकाणी आयकर विभागच्या पथकाने छापे टाकले होते. या छापेमारीत ही रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे.
काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा ओडिशात दारूचा मोठा व्यवसाय आहे. साहू यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप आहे. याच आरोपांखाली बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. छापेमारीत आयकर अधिकारीही हैराण झाले. खासदारांच्या ठिकाणांवरुन एवढी रोकड सापडली की ती नेण्यासाठी ट्रकची मदत घ्यावी लागली.