पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थी अनुयायी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांच्या संकल्पनेतून ६ डिसेंबर २०२३ रोजी ६ तास वाचन हा उपक्रम राबवून महामानवास अभिवादन करण्यात आले.
बार्टी पुणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विभागप्रमुख अनिल कांरडे, वॄषाली शिंदे, रवींद्र कदम, शुभांगी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सहाय्यक लेखाधिकारी गणेश देशमुख, दामोदर कळसकर, शिंदे, कार्यालय अधिक्षक डॉ संध्या नारखडे, प्रज्ञा मोहिते, सचिन जगदाळे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार, महेश गवई, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ अंकुश गायकवाड, विशाल शेवाळे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बार्टी, मुख्यालय ग्रंथालय , बार्टी, येरवडा संकुल ग्रंथालय, बार्टी उपकेंद्र नागपुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपुर , डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मुक्तीभुमी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येवला येथील ग्रंथालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ६ तास वाचन उपक्रम राबविण्यात आला यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, भारताचे संविधान, व ईतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती या उपक्रमास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी , अनुयायी, नागरिक, भीमसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून ६ तास वाचन करुन महामानवाला अभिवादन केले बार्टीच्या या उपक्रमाचे पुस्तक प्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, बार्टी उपकेंद्र नागपुर, प्रकाश जमदाडे, व्यवस्थापक राष्ट्रीय स्मारक महाड, पल्लवी पगारे व्यवस्थापिका , मुक्ती भूमी येवला राष्ट्रीय स्मारक, श्रीमती वैशाली खांडेकर, ग्रंथपाल , बार्टी , विनायक भालेराव , ग्रंथपाल, येरवडा, बार्टी यांनी ६ तास वाचन उपक्रम यशस्वीपणे पार पडला