अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे पळुन परदेशात गेले ?

    07-Dec-2023
Total Views |

aditya thakrey 
 
मुंबई: दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची एस आयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आल्यानंतर आदीत्य ठाकरे नेमके कुठे आहेत अशी चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे दुबईत असल्याची बातमी समोर आली आहे. कामानिमीत्त देशाबाहेर असल्याच सांगितलं जात आहे.

मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे पळुन परदेशात गेले असल्याचा दावा केला आहे. साधारण तीन वर्षांपुर्वी सुशांत सिंग राजपुत व त्याआधी दिशा सालियान आत्महत्या केस मध्ये नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. दिशा सालीयन प्रकरणाची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. यात आदित्य ठाकरेंना अटक होणार आहे म्हणूनच ते परदेशात पळून गेले असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 
 
दरम्यान, आदित्य ठाकरे एका परिषदेसाठी दुबईला गेल्याच सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद (COP28) दुबईत सुरू आहे. या परिषदेतसाठी आदित्य ठाकरे गेले आहेत.