राजस्थानला गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर नेऊन अशोक गेहलोत पायउतार; महिलांन विरोधात दाखल झाले तब्बल....
05-Dec-2023
Total Views |
जयपुर : राजस्थान मध्ये गेल्या १ वर्षात महिलांविरुद्ध ४५०० अपराधाची नोंद झाली आहे. तर एकूण ३.१२ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या बाबतीत राजस्थान देशातील पहिल्या क्रमांकाच राज्य बनलंय. एनसीआरबी दरवर्षी देशात घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करते. अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता. निवडणूक प्रचारात हा मुद्दा भाजपने मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता.
राजस्थानमध्ये २०२२ ला ५३९९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी २०२० आणि २०२१ मध्ये राजस्थानमध्ये अनुक्रमे ५३१० आणि ६३३७ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. बलात्काराच्या घटनांवर कारवाई करण्यातही राजस्थान खूप मागे आहे. एनसीआरबीच्या अहवालात असे दिसून आले आहे की २०२२ मध्ये राजस्थानमध्ये महिलांवरील बलात्कारासह एकूण ४५,०५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२१ आणि २०२० या वर्षाच्या तुलनेत राजस्थानमध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
राजस्थानमध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असताना अशोक गेहलोत यांच्या राजवटीत पोलीसही निष्क्रिय झालेले पहायला मिळाले. एनसीआरबीच्या या अहवालातून असे दिसून आले आहे की, राजस्थान पोलिस महिलांवरील गुन्ह्यांपैकी केवळ ५४% प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकले आहेत. देशातील इतर मोठ्या राज्यांमध्ये हा आकडा ७० टक्क्यांच्या वर आहे.
फक्त बलात्काराच्याच नाही तर इतर गुन्ह्यांमध्येही राजस्थान पुढे आहेत. राजस्थानमध्ये २०२२ मध्ये गुन्ह्यांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. २०२२ मध्ये राजस्थानमध्ये ३,१२,८०४ गुन्हेगारी घटनांची नोंद झाली आहे. २०२० मध्ये २.८४ लाख आणि २०२० मध्ये २.६० लाख घटना घडल्या. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये राजस्थानमध्ये १०% वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये २०२२ मध्ये १८३४ खुनाच्या घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये ते १७८६ आणि २०२० मध्ये १७१९ होते.