ललित पाटील प्रकरणी मोठी कारवाई! दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

    05-Dec-2023
Total Views |

Lalit Patil


पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी आणि ससुन रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
 
येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे आणि ससुन रुग्णालयातील डॉ. प्रवीण देवकाते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे याने ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी फोनवर संपर्क केल्याची माहिती पुढे आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
 
तसेच प्रवीण देवकाते याने ललित पाटीलला रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यातही देवकाते याचा हात असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.