मुंबई : मुंबईत राज्य शासनाच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करण्याची जबाबदारी घेतो असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.
धनगर समाज हा प्रामाणिक समाज असून राज्य सरकार त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. येत्या ३० दिवसात संयोजन समितीने मुंबई शहरातील जागा मला सुचवावी त्याठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबई शहरात स्मारक उभे करण्याची जबाबदारी मी घेतो असेही मंत्री लोढा यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती ही अतिशय चांगली लाभल्याने मंत्री लोढा यांनी कौतुक केले.