मुंबई : 'भारतीय मानक ब्युरो'मधील रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. 'भारतीय मानक ब्युरो'कडून या भरतीसंदर्भात एकूण १०७ रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या विभागात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. अर्जदारास अर्ज करताना संपूर्ण जाहिरात पाहावी त्यानंतरच अर्ज करावयाचा आहे. या भरतीकरिता आवश्यक बाबींची माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव -
कन्सल्टंट फॉर स्टँडर्डायझेशन अॅक्टिव्हिटीज
शैक्षणिक पात्रता -
सिव्हिल इंजिनियरींग, मेकॅनिकल इंजिनियरींग व पदांच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा -
६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण -
दिल्ली (एनसीआर)
वेतनमान -
७५ हजार रुपये
या भरतीकरिता अर्जदाराकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्जदाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृतीस दि. ३० डिसेंबर २०२३ पासून सुरूवात
अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि. १९ जानेवारी २०२४ असेल.
भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा