रेवंत रेड्डींमुळे ढासळला बीआरएस चा बुरुज!

    03-Dec-2023
Total Views |
arr
 
हैद्राबाद: तेलंगाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणाच्या स्थापनेपासूनच मुख्यमंत्री असलेल्या बीआरएस पक्षाच्या के चंद्रशेखर राव यांचा काँग्रेस ने दारुण पराभव केला आहे. आत्तापर्यंत च्या अकड्यानुसार २०१८ च्या निवडणूकीत ८८ जागा मिळवून सत्तेवर असणाऱ्या केसीआर यांना यावेळी ३९ जागांवर समाधान मानावे लागत आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार ए. रेवंथ रेड्डी यांना मानण्यात येत आहे.
 
कोण आहेत रेवंथ रेड्डी ?
विभाजनापूर्वीच्या आंध्रप्रदेश च्या मेहबूबनगर चे रहिवासी असलेले ए. रेवंत रेड्डी महाविद्यालयीन जीवनातच राजकारणात सक्रिय होते. महाविद्यालयात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. तेथुनच त्यांच्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. २००९ साली सर्वप्रथम त्यांनी विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. आज ते तेलंगणा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत.
 
दरम्यान, राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगड तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहेत. जवळपास सर्व राज्यातील सत्तास्थपनेच चित्र आता स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाला राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. तेलंगाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणा मध्ये ११९ पैकी काँग्रेसला ६३ जागा तर बीआरएस ला ४० जागा मिळताना दिसत आहेत.