मुंबई : उत्तर भारतातील वाढत्या थंडीमुळे धुक्याची चादर पसरलेली पाहावयास मिळत आहे. या दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक दोन्ही प्रभावित झाल्याचेदेखील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये दाट धुके पसरल्यामुळे येथील शाळा दि. १ ते ६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये दि. ०१ ते १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून हरियाणातील शाळा १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.