"मी देव धर्म पूजे अर्चेपासून मी दूर असतो!", राम मंदिर सोहळ्यावर शरद पवारांचं वक्तव्यं

    29-Dec-2023
Total Views |
NCP President Sharad Pawar on Ram Mandir Invitation

मुंबई :
येत्या नवीन वर्षात दि. २२ जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील काही नेत्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, "मी देव धर्म पूजे अर्चेपासून मी दूर असतो!" असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, मला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही. माझी दोन-तीन श्रध्दास्थाने आहेत जिथे मी आवर्जून जातो, पण मी पूजेपासून लांब असतो. त्याचं मी काही जाहीर प्रदर्शन, जाहिरात करत नाही. तसेच, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.