नवी दिल्ली : 'आयुष्मान भव अभियानां'तर्गत देशभरात ५ कोटींहून अधिक आभा खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावा आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावा अशा एकूण १३ लाख ८४ हजार ३०९ आरोग्य मेळ्यांव्यांना भेट देणाऱ्यांच्या संख्येने एकूण ११ कोटींची पल्ला गाठला आहे.
दरम्यान, आयुष्यमान भव अभियानाद्वारे आतापर्यंत ६ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत औषधे आणि ५ कोटींहून अधिक लोकांना मोफत निदान सेवा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या सुरू असलेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावे आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावे यांची एकत्रित संख्या २८ डिसेंबरपर्यंत १४ लाखांच्या आसपास असून या आरोग्य मेळाव्यांना भेट देणाऱ्यांची संख्या ११ कोटींवर पोहोचली आहे.