मला हिंदीची स्वप्न बघण्याची गरज नाही – प्रियदर्शनी इंदलकर

    27-Dec-2023
Total Views |

priyadarshani 
 
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील प्रत्येत विनोदवीर प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. हास्यजत्रेतून मिळालेल्या नावामुळे प्रियदर्शिनीने 'फुलराणी' चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली. आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा प्रत्येक कलाकाराचा निराळा असतो. याच बद्दल प्रियदर्शनी हिने नुकतेच एका मुलाखतीत भाष्य केले. 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिला "सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांनी हिंदीत काम केले आहे. त्यांना बघून तुला पण यांच्यासारखं व्हावं, असं वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियदर्शिनीने मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही असे बिनधास्त वक्तव्य केले.
 
प्रियदर्शनी म्हणाली की, “मला सई ताम्हणकर व्हायचंय, असं आपल्याला वाटूच शकतं. पण, आपल्याला कुणासारखं तरी व्हायचं आहे, असं वाटणं हे समोरच्याचं क्रेडिट आहे. मला कॉपी नाही करायचंय...पण, तिथपर्यंत पोहोचायचं आहे ही स्वप्न नक्कीच बघितली जातात. मला वाटतं फक्त हिंदी नव्हे तर तमिळ वगैरे अश सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करावं. आपल्याकडे सध्या हिंदीचं खूप आकर्षण आहे. मग तू हिंदीत का नाही काम करत, असं विचारतात. पण, मी मराठीत काम करतेय ना...मी मराठीतही टॉपची अभिनेत्री बनू शकते".
 
पुढे ती असे देखील म्हणाली की, "मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही. आपल्या हक्काचं व्यासपीठ सोडून झगमगाट जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा चांगल्या कामासाठी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करावं. मला मराठी प्रेक्षकांना जास्त कंटेंट द्यायला आवडेल. जर, मी हिंदीत काम केलं तर तिथे जे मी अनुभवलं ते मराठी प्रेक्षकांना द्यायला आवडेल. बाहुबलीसारखा चित्रपट मराठीत यावा, असं मला जास्त वाटतं. मी त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा तो कंटेंट आपल्याकडे यायला हवा, असं मला वाटतं," असे प्रियदर्शनी म्हणाली.