भारत जोडो २.० कोणकोणत्या राज्यातून जाणार?

    27-Dec-2023
Total Views |
 
Bharat Nyaya Yatra
 
 
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस पक्षाने 'भारत न्याय यात्रे' ची घोषणा केली आहे. ही यात्रा १४ राज्यांमधून जाणार असुन ६२०० किमी चा प्रवास करणार आहे. १४ जानेवारीला मणिपूरच्या इंफाळमध्ये यात्रा सुरू होणार असुन २० मार्चला मुंबईत संपेल.
 
 
यात्रा मणिपुर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या यात्रेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही यात्रा काढण्यात येत आहे.