एकट्या केरळमधून कोरोना JN.1 चे ७७% रूग्ण अॅक्टीव्ह!
26-Dec-2023
Total Views |
मुंबई : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4170 वर पोहोचली आहे. यापैकी 77% पेक्षा जास्त प्रकरणे केरळमध्ये आहेत. देशात 24 तासांत कोरोनाचे एकूण 412 नवीन रूग्ण आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यु झाला आहे. कर्नाटकात एका दिवसात कोरोनाचे ९२ रूग्ण आढळले आहेत.
कोरोना बाधित रूग्णांचा मृत्युदर १.१९ टक्के इतका आहे. आतापर्यंत कोविड लसीचे २२०.६७ डोस देण्यात आले आहेत. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. केरळमध्येही कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, नवीन व्हेरियंटबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, नवीन प्रकार विशेषतः धोकादायक नाही आणि त्यामुळे प्रभावित झालेले रुग्ण घरीच बरे होत आहेत.
भारतात कोविड-19 च्या JN.1 उप-फॉर्मचे पहिले प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. मात्र, आता महिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.