नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला भारताने जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारने नुकतेच दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारकडून वृत्तपत्रात जाहिरात ही देण्यात आली आहे. त्यानुसार दाऊदची रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव दि.५ जानेवारीला दुपारी २ ते २.३० यावेळेत होणार आहे. दाऊद हा रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मुंबके गावचा रहिवाशी होता. या गावात त्याचा बंगला आणि आंब्याची बाग आहे.
दरम्यान दि. १२ डिसेंबर रोजी दाऊद इब्राहिमवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर दाऊदची प्रकृती चिंताजनक असून कराचीतल्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे ही काही वृत्तसंस्थानी सांगितले होते. मात्र या बातमीला पाकिस्तान आणि भारताकडूनही दुजोरा दिला नाही.