चीनची मुजोरी कायम! तैवानच्या हद्दीत घुसखोरी

    24-Dec-2023
Total Views | 65
 taiwan
 
ताइपे : चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. चीन आणि तैवानमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनच्या जे-१०, जे-११ लढाऊ विमानांनी स्ट्रेट ऑफ मेडियन लाइन ओलांडली.
 
स्ट्रेट ऑफ मेडियन लाइन ही दोन देशांमध्ये अनधिकृत जल सीमा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून चिनी विमाने आणि पाळत ठेवणारी जहाजे सातत्याने या सीमेचे उल्लंघन करत आहेत. यापूर्वी एप्रिलमध्येही चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या सीमेत घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे तैवानमध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
 
सार्वत्रिक निवडणुकांसोबत राष्ट्रपतीच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत. या निवडणूकीत कोण जिंकणार? याचा सुद्धा चीन आणि तैवानाच्या भविष्यातील संबंधांवर होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. त्यातच आता चीनच्या आक्रमकतेचा परिणाम सुद्धा निवडणूकांवर होईल. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121