खर्गे आणि मोदी यांच्यामध्ये जनता मोदींनाच निवडेल: अजित पवार
22-Dec-2023
Total Views |
मुंबई : इंडीया आघाडीचे मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खुप फरक आहे. आणि जनता मोदींनाच निवडेल अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक २२ डिसेंबर ला पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांनी हे मत व्यक्त केल आहे.
मार्च पर्यंत आचारसंहीता सुरु होईल त्यामुळे संघटनात्मक काम करा असही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. आरक्षणाविषयी बोलता काळजी घ्या, कायद्यानुसार आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहीजे, बोलताना गैरसमज निर्माण करु नका, कोणतीही चर्चा अथवा काम करताना मित्रपक्षांना इजा होईल अस विधान करु नका, त्याचबरोबर आपल्याला कोणाचा अपमान करायचा नाही पण आपल्या नेत्यांबद्दल कोणी काही बोललं तर योग्य उत्तर द्या असही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल.
आपण भाजपच्या तिकीटावर लढणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच महायुतीत लढणार आहे असही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पवार कुटुंबियांशी होत असलेल्या भेटीगाठीं विषयी बोलताना ते म्हणाले " त्या भेटी पुर्णतः कैटुंबिक आहेत. आम्ही कोणाला फसवणार नाही. ज्याच्यासोबत आहोत त्यांच्यासोबतच राहु. माझ्या भुमिकेत कुठेही बदल होणार नाही हे मी स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ शकतो".