मुंबईकरांनो रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

    22-Dec-2023
Total Views |
Sunday Mumbal Local Megablock

मुंबई :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांमुळे प्रवाशांनी योग्य नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग (सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५)

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट), मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

- सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सदर गाड्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

- डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छशिमट येथून बदलापूरसाठी सकाळी १०.२० वाजता लोकल असेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छशिमट येथून बदलापूरकरिता दुपारी ३.३९ वाजता सुटेल.

- अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची अंबरनाथ लोकल छशिमट येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली आसनगाव लोकल छशिमट येथे सकाळी ४.४४ वाजता पोहोचेल.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग (सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५)(बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाहीत)

(नेरुळ/बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून)

- सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छशिमट मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छशिमट मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

- सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत बंद राहतील.

- डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छशिमट येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छशिमट येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता असेल आणि पनवेल येथे ४.३६ वाजता पोहोचेल.
- अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी सुटणारी छशिमटसाठी शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता पनवेल येथून सुटेल आणि ११.३६ वाजता छशिमट येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर सुटणारी छशिमटसाठी पनवेल येथून पहिली लोकल दुपारी ४.१० वाजता असेल आणि ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

- डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०० वाजता असेल आणि पनवेल येथे ४.५२ वाजता पोहोचेल.

- अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ५.२० वाजता पोहोचेल.

- ब्लॉक कालावधीत छशिमट मुंबई ते वाशी मार्गावर विशेष लोकल

- ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध

- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध