महाराष्ट्र शासनात नोकरीची सुवर्णसंधी! 'या' विभागांतर्गत गट-क पदांकरिता सरळसेवा भरती

    22-Dec-2023
Total Views |
Food and Civil Supplies Department Maharashtra Govt
 
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे सरळसेवा भरतीच्या माध्यमातून एकूण ३४५ रिक्त जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. तसेच, अर्ज करण्याकरिता दि. १३ डिसेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर दि. ३१ डिसेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
 
पदाचे नाव
 
१) पुरवठा निरीक्षक (गट क)
२) उच्चतर लिपिक (गट क)
 
वयोमर्यादा
 
१८ ते ३८ वर्षे
 
नोकरीचे ठिकाण
 
संपूर्ण महाराष्ट्र
 
शैक्षणिक पात्रता

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, पदवीधर
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
 
अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १,००० रुपये परीक्षा शुल्क
राखीव वर्गाकरिता उमेदवारांकरिता ९०० रुपये परीक्षा शुल्क

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा