नेदरलँडची गॅब्रिएला यूपीतील हार्दिकच्या प्रेमात! सातसमुद्रापार येऊन केलं हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न

    02-Dec-2023
Total Views |
 
Hardik Verma
 
 
उत्तर प्रदेश : फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी हार्दिक वर्माने नेदरलँडमध्ये राहणारी त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डुडा हिच्याशी लग्न केले आहे. या दोघांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर २०२३) हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले आणि इतर वैवाहिक विधी पूर्ण केले. हार्दिक हा फतेहपूरच्या दतौली गावचा रहिवासी आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी तो नोकरीसाठी नेदरलँडला गेला होता. हार्दिकला तिथल्या एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली. काम करत असताना त्याच कंपनीत काम करणारी त्याची सहकारी गॅब्रिएला त्याला भेटली.
 

Hardik Verma

 
 
यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही जवळपास तीन वर्षे एकत्र राहिले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत हार्दिकने त्याच्या पालकांशी चर्चा केली. फोनवर झालेल्या चर्चेनंतर हार्दिकच्या पालकांनी या लग्नाला परवानगी दिली. त्याच्या पालकांकडून परवानगी मिळाल्यानंतर हार्दिक गेल्या आठवड्यात गॅब्रिएलासोबत त्याच्या गावी परतला. तेथे त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचेही जोरदार स्वागत केले. दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते.
 
 
हार्दिकचे कुटुंब गुजरातमधील गांधीनगर येथे राहते. हार्दिकने सांगितले की, "11 डिसेंबर 2023 रोजी गांधीनगरमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये गॅब्रिएलाचे वडील मार्सिन डुडा, तिची आई बार्बरा डुडा आणि इतर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते 25 डिसेंबरला नेदरलँडला परततील आणि तिथल्या चर्चमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार विवाह सोहळाही पार पाडतील."