विकी कौशलच्या’ सॅम बहादुर’ चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री!

    19-Dec-2023
Total Views |

vicky kaushal
 
मुंबई : चित्रपटांचा आशय-विषय प्रेक्षकांच्या पसंतीस आला तर नक्कीच त्या चित्रपटांना गर्दी होतेच. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचा विषय हा प्रत्येक देशप्रेमीसाठी अभिमानाने छाती फुलवणाराच होता. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाने नुकतेच १०० कोटी क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु न शकणाऱ्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने मात्र तिसऱ्या आठवड्यात चांगलीच झेप घेतली असून आता १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे.
 
सॅम बहादुर चित्रपटात ‘सॅम माणेकशॉ’ यांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल याने देखील याबाबत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. Sacnilk च्या माहितीनुसार, विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर आत्तापर्यंत या चित्रपटाने ७३.९१ कोटींची कमाई केल्याचे समजत आहे. ‘सॅम बहादुर' चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत २० कोटींच्या घरात कमाई केली होती.