मुंबई : नागपूर महानगरपालिकेतील रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील गट क संवर्गातील एकूण ३५० रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे.
पदाचे नाव -
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी(०७), उप-अग्निशमन अधिकारी(१३), चालक यंत्रचालक(२८), फिटर कम ड्रायव्हर(०५), अग्निशामक विमोचक(२९७) इ.
शैक्षणिक पात्रता -
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे बंधनकारक.
फिटर कम ड्रायव्हर आणि अग्निशामक विमोचक या पदांकरिता माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा -
पदांच्या आवश्यकतेनुसार असेल.
अर्ज करण्याची सुरुवात दि. ०६ डिसेंबर २०२३ पासून तर अंतिम मुदत दि. २७ डिसेंबर २०२३ असणार आहे.