विविध प्रकृतीअनुरुप केसांची विविधता याबद्दल मागील लेखांमधून आपण विस्तृतपणे माहिती करुन घेतली. केसांची वाढ व सामान्य जतन कसे करावे, याबद्दल थोडे जाणून घेऊया.
मनुष्य शरीरावर (संपूर्ण शरीरभर) केस असतात. शरीरावरील केसांना‘लव’ असे म्हणतात. हे केस पौगंडा अवस्थेपासून (Adolescence age) अधिक दृश्य होऊ लागतात. त्यांची वाढ अधिक होते. सर्वांगावरील लव ठरावीक ठिकाणी नसते. जसे हाता-पायाच्या तळव्यांवर, ओठांवर, पापण्यांवर, गुडघ्याच्या मागील बाजूस, कानाच्या मागील बाजूस इ. तसेच, पापण्यांवर आणि भुवयांवरील केसांची वाढ अन्य शरीरावरील लव/केसांपेक्षा अधिक लांब असते.
केसांचे मूळ त्वचेच्या आत असते. या मूळाशीच त्याचे पोषण, संवेदना व वाढ होत असते. मूळ जितके भक्कम तेवढे केसांची बळकटी उत्तम होते. आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा अंतर्भाव केल्यास केसांसाठी उपयोगी ठरते. शरीरावरील लव खूप वाढत नाही. (डोक्याच्या केसांच्या तुलनेत) पण, जेवढी असते (विशेषतः हाता-पायावरील व खाकेतील) तेवढीसुद्धा स्त्रियांना/मुलींना नकोशी असते. केसांच्या विविध समस्यांवर चिकित्सा करतेवेळी अंगावरील लव याची वाढ खुंटविणे/थांबविणे व डोक्यावरील केसांची वाढ वाढविणे, हे प्रामुख्याने केले जाते. तेव्हा ज्याचे संवर्धन, जतन करायचे आहे, अशा डोक्यावरील केसांची निगा याबद्दल सविस्तर बघू.
केसांची निर्मिती-वाढ-व गळती हे चक्र सतत चालू असते. पण, सगळे केस एकदम एकत्र वाढत नाही. तसेच गळतही नाहीत. तसे झाले असते, तर साप जशी कात टाकून नवीन कात परिधान करतो, तसे आपले ही झाले असते. पण, तसे होताना दिसत नाही. जे केस वाढतात, ते कालांतराने गळणारच आहेत. दैनंदिन जीवनात, रोज सुमारे ५०-१०० केस गळणं हे स्वाभाविक समजले जाते. यापेक्षा जर अधिक असले, तर मात्र त्याला केस गळणे हा त्रास म्हणता येईल.
केसांचा प्रत्येक टप्पा (निर्मिती-वाढ व गळती) विशिष्ट कालावधीत होत असते. जेवढे मूळ भक्कम व उत्तम पोषण मिळते, तेवढे वाढीची मर्यादा अधिक होत जाते. परिणामी, केसांची वाढ चांगली आहे, असे म्हटले जाते.म्हणजेच जर केस उत्तम प्रतीचे व लांबसडक हवे असतील, तर त्यांची मूळं सक्षम असणे गरजेचे आहे. पोषण मूळांशी होणे महत्त्वाचे आहे. फक्त बाहेरील ट्रिटमेंट (KERATIN TREATMENT, CYSTIEVE TREATMENTS {d{dY HAIR SPA TREAMENTS इ.) ने फायदा होत नाही. या ट्रिटमेंटमुळे बाहेरील केसांचा (SCALPच्या बाहेर वर आलेला द़ृश्यमान केश भाग) पोत सुधारतो. केस चमकदार दिसतात. त्यांचे टेक्सचर सुधारल्यासारखे दिसते. पण, हे सगळं तात्पुरते आहे. जर उत्तम पोत, वाढ व चमकदार केस कायम हवे असतील, तर पोषित केसांची मुळे असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, शांत झोप व उत्तम केसांची निगा घेणे महत्त्वाची आहे.
केसांचे पोषण मुळांपासून होते, हे आपण बघितले. तेव्हा धुतलेल्या केसांना तेलाने हलके मॉलिश करणे अपेक्षित आहे. बर्याचदा केस धुण्यापूर्वी केसांची तेल लावून चंपी केली जाते किंवा भरपूर तेल लावले जाते. पण, हे फायद्याचे नाही. केसांच्या खाली (SCALP)वर घाम, धुळीचे कण व इतर आसमंतातील घटकांमुळे तो SCALP अस्वच्छ असतो. क्वचित प्रसंगी SCALPवर खाजही येते. अशा अस्वच्छ स्तरावर तेलाने मालिश केल्याने त्याचे त्वचेमार्फत शोषण होत नाही.तेव्हा, धुतल्यानंतर स्वच्छ SCALP व केस असते वेळी केसांना तेल (थोड्या प्रमाणात) लावावे व हलक्या हाताने चोळून जिरवावे. आपली त्वचा ‘लिपोफिलिक’ असते म्हणजे स्नेह प्रिय. त्वचेला स्निग्धांश व आर्द्रता दोन्हीची गरज असते. म्हणून केसांना अजिबात तेल न लावणे हे चुकीचे आहे. त्वचेच्या मुळांची ताकद भक्कम ठेवायला असल्यास नियमित तेल लावून मालिश करणे महत्त्वाचे आहे. केस धुण्यापूर्वी संपूर्ण केसांना तेल लावून मग केस धूतल्यास शॅम्पू, कंडिशनर व अन्य तत्सम रसायनांचा केसांचा प्रत्यक्ष अनिष्ट परिणाम कमी होण्यास मदत होते. खूप रासायनिक घटकांचा वारंवार उपयोग केल्याने केसांचा पोत बिघडतो. केस अधिक रूक्ष व कोरडे होतात. असे केस लवकर तुटतात व हे केस अधिक टोचताना ही म्हणजेच, त्यांचा स्पर्श सुखावह होत नाही.
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे आणि ओले केस ड्रायरने वाळवू नयेत. HOT DRYER मुळे केसांची मुळे नाजूक होऊन केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. वारंवार HOT BLOWER/DRYER वापरल्यास SCALP ही रूक्ष होतो व DRY-FLAKY DANDRUFF(कोंडा)ल वरच्या वर होत राहतो. SCALP ला खाज अति येते. या सगळ्यावर साधा सोपा उपाय म्हणजे SCALP ला थोडे थोडे तेल नियमित लावणे होय.
केसांची निगा घेतेवेळी अजून एक महत्त्वाची खबरदारी जी घ्यावी लागते ती म्हणजे अतिरिक्त मिठाचे प्रमाण टाळणे, हे होय. आयुर्वेदात असे सांगितले आहे की, प्रत्येक रसाचा (चवीचा) शरीरांवर आरोग्यावर परिणाम होतो. पण, त्या रसाचा अतिरेक केल्यास किंवा तो रस आहारातून पूर्णतः बाद केल्याच त्याचे अनिष्ठ व आरोग्याला अहितकर परिणाम होतात, भोगावे लागतात. मीठाचा/खारट चवीचा, जर अतिरेक झाला तर वार्धक्य लवकर ओढावते, असे आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे.
केस अधिक गळणे, लवकर पिकणे, त्वचा अधिक सुरकुतणे हे सगळं खारट रसाचा अति अभ्यास/वापर केल्यामुळे घडतो. आता बरेचदा दवाखान्यात रुग्णांना मीठ कमी खा, असे सांगितल्यावर पुढील दोनपैकी एक उतर अधिक समोर येते- आम्ही सौध मीठ (IODINE युक्त) खात नाही सैंधा नमक घेतो, (ROCK SALT) पाडेलोण (BLACK SALT) घेतो किंवा दुसरे उत्तर म्हणजे, जेवणात कमीच असते. मीठ कमी पडले तरी वरून घालून घेत नाही, तर दोन्ही उत्तरे बरोबरही आहेत आणि चूकही. ते कसे ते मी सांगते. जेव्हा चवीचा अतिरेक म्हटले जाते, तेव्हा विशिष्ट प्रकारचे मीठ नव्हे, तर खारट रस/चव असलेले सगळ्या पदार्थांचा त्यात समावेश होतो. (अगदी ROCK SALT व BLACK SALT चाही) आणि शेंदेलोण/सेंधानमक हे सध्या आयोडिनयुक्त मिठापेक्षा अधिक चवीला खारट असते.
दुसरे आहारातून (भाजी, आमटी, कोशिंबीर इ. अन्न पदार्थ) मिठाचे कमीप्रमाणे मीठ हे ‘INDUS TRIAL PRESERVATIVE’ म्हणून वापरले जाते. म्हणजे बाजारात मिळणार्या सर्व रेड्डी टू ईट अन्नपदार्थांची टिकून राहण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यात मीठ घालावेच लागते व घातले ही जाते. अगदी गोड चवीच्या बिस्कीट, टोस्टमधून ते विविध पास्ता सुप वेफर्स लाह्या इ. पाकिटांमधून सुद्धा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कुठलेही पाकिटातील अन्नपदार्थ ‘डायरेक्ट’ खातो, अतिरिक्त मीठ स्वभाविकपणे खाल्ले जाते. तसेच काहींना फळांवर, फ्रूट प्लेटवर मीठ/चाट मसाला घालून खायची सवय आहे. यामुळे देखील मिठाचे अधिक सेवन होत असते.
तेव्हा उत्तम, निरोगी, भक्कम व लांब केसांची ज्यांना आवड व इच्छा आहे त्यांनी वरील नियमांचे आपल्या दैनंदिन जीवनाचा अवश्य अवलंब करावा. (क्रमश:)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
vaidyakirti.deo@gmail.com