]
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ६०-७० च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जुहूमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ८० वर्षीय तनुजा यांना वयोमानामुळे रविवारी रुग्णालयात नेले असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा जुहूतील रुग्णालयात भरती असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
अभिनेत्री तनुजा यांनी प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली भाषेतील मनोरंनसृष्टीच अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तनुजा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या बहिण नुतन हिच्यासोबत अभिनयाचा प्रवास सुरु केला होता. १९५० साली आलेल्या हमारी बेटी या चित्रपटापासून तनुजा यांनी कलेचा प्रवास सुरु केला. त्यावेळी त्यांना बेबी तनुजा या नावाने ओळखले जात होते. त्यानंतर १९६० साली छबीली या चित्रपटातून त्यांनी प्रमुख नायिका साकारली ज्याचे दिग्दर्शन त्यांच्या आई आणि बहिणीने केले होते. पुढे त्यांची अभिनयाची कारकिर्द अविरतपणे सुरुच राहिली. ‘मेम दीदी’, 'बहारों फिर भी आएंगी', 'ज्वेल थीफ', 'हाथी मेरे साथी', ‘खाकी’, ‘भुत’, ‘साथिया’, ‘यादगार’, अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.