"आदित्य ठाकरे तुरुंगात जातील"; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य
17-Dec-2023
Total Views |
मुंबई : "अभिनेता सुशांत सिंग आणि दिशा सालियन या दोघांची हत्या झाल्याचे मी आधीच सांगितले आहे. यात राज्याच्या एका मंत्र्याचा सहभाग होता. यापूर्वी तपास झाला नाही. आता तपास सुरू आहे. सत्य बाहेर येईल. या प्रकरणी आदित्य ठाकरे नक्कीच तुरुंगात जातील." असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दि.१६ डिसेंबर, शनिवारी केले.
काही दिवसांपूर्वीच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी या प्रकरणाची चौकशी करेल. ही एसआयटी आदित्य ठाकरेंची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे.