मुंबई : ठाणे महानगरपालिकेमधील विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरल्या जातील.
पदाचे नाव-
अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता -
अधिव्याख्याता- (एकूण १५ पदे)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी(MBBS).
वैद्यकीय अधिकारी- (एकूण १० पदे)
राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी(MBBS).
मुलाखतीची तारीख, पत्ता-
दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी.
वेतन-
अधिव्याख्याता- १,५०,००० रुपये प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी- ७५,००० रुपये प्रति महिना
नोकरीचे ठिकाण-
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.