हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

    15-Dec-2023
Total Views |
Hardik Pandya As a Mumbai Indians Captain
 
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता मैदानात उतरेल. माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून पंड्याकडे संघाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत.


दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या X अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०१३ साली रोहितने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर तब्बल १० वर्षे कर्णधारपदाच्या कारकीर्दीत ६ वेळा विजेतेपद मिळविले. तुमचा वारसा ब्लू आणि गोल्डमध्ये कोरला जाईल. धन्यवाद. अशा शब्दात मुंबई इंडियन्सने आभार मानले आहेत.