अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

    15-Dec-2023
Total Views |

shreyas talpade 
 
 
मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला तातडीने अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस आगामी रोहित शेट्टी दिग्दर्शित वेलकम टू जंगल चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.
 
 
 
 
 दरम्याम, मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयसची रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याच्या छातीत ब्लॉक असल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्याची अँजिओप्लास्टी केली. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.