सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर वायरल नेमकं काय आहे प्रकरण?
11-Dec-2023
Total Views |
मुंबई : या वर्षीचा सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेते सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पंजाबमध्ये सनी देओल यांचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले असून यात देओल यांना शोधून आणणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असेही यात नमुद केले आहे.
दरम्यान, सनी देओल यांच्याबद्दल असे पोस्टर जागोजागी लावण्याची ही पहिली वेळ नसून यापुर्वी देखील असे पोस्टर विविध ठिकाणि लावण्यात आले होते. मनोरंजनासोबत सनी देओल राजकारणात देखील सक्रीय असून ते गुरदासपूर - पठाणकोट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते खासदार झाल्यानंतर त्यांनी कधीही दोन्ही जिल्ह्यात भेट दिली नसून तेथे कोणतेही विकासकार्यही केले नसल्याचा तेथील स्थानिक लोकांचा आरोप आहे. कदाचित याच कारणामुळे हे पोस्टर लावले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सनी देओल यांचे हे बेपत्ता झाल्याचे पोस्टर पठाणकोट जिल्ह्यातील हल्का भोया येथील सरना बस स्टँडवर लावण्यात आले आहे. याआधी सनी यांच्याविरोधात हल्का पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले होते.