"गेल्या ५० वर्षात एकाही दिग्दर्शकाने", नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत

    11-Dec-2023
Total Views |

nana patekar 
 
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्ष विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच एक मोठी खंत व्यक्त केली आहे. नाना पाटेकर यांनी केरळमध्ये २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होतीय यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, “मला आत्तापर्यंत ५० वर्षात एकाही मल्याळम दिग्दर्शकाने चित्रपटासाठी विचारणा केली नाही”.
 
नाना पाटेकर म्हणाले की, “मी ३२ वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी केरळमध्ये पहिल्यांदा आलो होतो. आजही केरळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत काहीही बदललेले नाही. इथे राहणारे लोक त्यांच्या हृदयाने अधिक विचार करतात. त्यामुळे भाषा भिन्न असल्या तरी त्यांच्याशी संवाद साधणे सोपे जाते. गेल्या ५० वर्षांत मल्याळम इंडस्ट्रीधून एकाही दिग्दर्शकाने माझ्याशी संपर्क साधला नाही... याचा अर्थ एक अभिनेता म्हणून मला सुधारावे लागेल. मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही”, असे नाना पाटेकर म्हणाले.
 
काही महिन्यांपुर्वी नाना पाटेकर यांचा ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या नाना पाटेकर आगामी ‘ओले आले’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत.