नवी दिल्ली : "मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श आहे", असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत मंडपम येथे आयोजित मानवाधिकार दिनाच्या समारंभावेळी बोलताना केले. ते म्हणाले, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात मानवाधिकारांना चालना देण्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे भारताने जगासमोर 'आदर्श ' म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे, असेही उपराष्ट्रपती धनखड यावेळी म्हणाले.
दरम्यान, मानव अधिकारांच्या बाबतीत जगातील कोणताही भाग इतका समृद्ध नाही, जितका आपला देश मानवाधिकारांनी समृद्ध झालेला आहे, असे सांगतानाच "आपली सांस्कृतिक मूल्ये आणि संवैधानिक वचनबद्धता आपल्याला मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करण्याप्रति आपली कटिबद्धता प्रतिबिंबित करते, जी आपल्या डीएनएमध्येच आहे", असेही जगदीप धनखड यावेळी म्हणाले.