स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आज शास्त्रीय नृत्य उत्सव ‘स्फूर्ती‘

    01-Dec-2023
Total Views |
savrkar
मुंबई: नृत्यदर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्सतर्फे शास्त्रीय नृत्य उत्सव ‘स्फूर्ती‘ या कार्यक्रमाचे शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, दादर येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून नवोदित कलाकारांसाठी एक हक्काचा रंगमंच उपलब्ध होणार आहे.
 
या उत्सवादरम्यान एकाच रंगमंचावर विविध शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण आणि गीतरामायण ही नृत्य नाटिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कविता आधारित नृत्य सादरीकरणाचे कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रम नि:शुल्क असून शास्त्रीय नृत्याचा आविष्कार अनुभवायला आणि गीत रामायणा सारखी अजरामर झालेली कलाकृती नृत्यनाटिका पाहायला जरूर या, असे आवाहन करण्यात आले आहे.