दिवाळीच्या फराळात लोकांची पसंत ठरतेय 'मॅगो म्हैसूर'

रेडीमेड फराळाला महागाई ची फोडणी; फराळांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ!

    09-Nov-2023
Total Views |
Diwali News

डोंबिवली :
दिवाळी म्हटलं की सर्व प्रथम डोळ्यासमोर येतात ते म्हणजे फराळाचे पदार्थ. वर्षभर फराळांचे पदार्थ बाजारात मिळत असले तरी दिवाळीत त्यांना विशेष मागणी असते. त्यातही तयार फराळाला ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जाते. पण यंदा फराळांच्या पदार्थांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे तयार फराळाला महागाई ची फोडणी बसली आहे.

आता फराळ बारा ही महिने मिळत असल्याने दिवाळीत काहीतरी व्हरायटी पदार्थांमध्ये खवव्वायांना हवी असते. यासाठी कुलकर्णी बद्रस च्या श्रीपाद कुलकर्णी यांनी मॅगो म्हैसूर बाजारात आणला‌ आहे. या मॅगो म्हैसूरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पारंपरिक पदार्थांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. पण अनारसे करण्यासाठी काही वर्षांनी महिला मिळतील की नाही याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. फराळ बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालांच्या किंमती तसेच कर्मचाऱ्यांची रोजंदारी वाढल्याने फराळांच्या पदार्थांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तसेच आता घरगुती उद्योजकाची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे गल्लोगल्ली दिवाळी फराळ विकला जात आहे. त्यांचा थेट परिणाम वर्षानुवर्ष फराळ विकणाऱ्या दुकान विक्रेत्यांवर झाला‌ आहे. त्यामुळे दुकान विक्रेत्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली. फराळात आता ऑर्डर दिल्या जात नसल्या तरी ग्राहक थेट दुकानात येऊन फराळ खरेदी करत आहेत. मागील वर्षी पर्यंत 1500 किलो चकली विकली जात होती ती आता 700ते 800 किलोवर आले आहे असे फराळ विक्रेते सुनील शेवडे यांनी सांगितले.

परदेशी फराळांच्या मागणीत घट

मराठमोळ्या कुटुंबातून आपल्या परदेशात राहणाऱ्या मुलांना फराळ पाठवित असतात .‌पण आंतरराष्ट्रीय कुरिअर च्या किंमतीत वाढ झाल्याने परदेशी फराळांच्या मागणीवर ही परिणाम झाला आहे. अंदाजे १५ टक्क्यांनी परदेशी फराळांच्या मागणीत घट झाली आहे.अमेरिकेत फराळाला सर्वात जास्त मागणी आहे.
 
चिवडा व चकलीला विशेष मागणी

दिवाळीच्या फराळांमध्ये कानवले, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या सारख्या पारंपरिक पदार्थांना मागणी असली तरी चिवडा आणि चकली या तिखट पदार्थांना विशेष मागणी असल्याचे विक्रेते सुनील शेवडे यांनी सांगितले ‌.