श्री सिद्धिविनायक मंदिर अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; बांदेकरांना अश्रु अनावर!
08-Nov-2023
Total Views | 410
मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना हटवण्यात आलं. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी २४ जुलै २०१७ ते २३ जुलै २०२३ पर्यंत ६ वर्षांचा अनुभव आदेश बांदेकरांनी सोशल मिडीयावरुन व्यक्त केला आहे. यावेळी आदेश बांदेकरांना अश्रु अनावर झाले.
सोशल मिडीयावर आपला अनुभव सांगताना बांदेकर म्हणाले, "क्षण आनंदाचा…२४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला. पण ह्या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी ह्यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही… हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले." असं बांदेकर म्हणाले.