एआयआरएफचे उद्या वार्षिक अधिवेशन

    07-Nov-2023
Total Views |
All India Railwaymen's Federation news


मुंबई
: ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनच्या (एआयआरएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेचे बुधवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी परळ येथील कामगार मैदानात आयोजित करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागीय अधिकारक्षेत्रातील दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि अभ्यागत उपस्थित राहण्याची अपेक्षा अजोजक मान्यताप्राप्त युनियन राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) (CR/KR) केली आहे. याबाबत एआयआरएफचे सरचिटणीस कॉ. शिवगोपाल मिश्रा आणि अध्यक्ष कॉ. कन्निया, एनआरएमयूचे सरचिटणीस वेणू नायर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यात विशेषतः रेल्वे कामगारांच्या विविध श्रम आणि सामाजिक आर्थिक परिस्थितीवर गंभीर चर्चा आणि चर्चा करण्यात येणार आहे.