मुंबई : अफगाणिस्तानचा विश्वचषकाचा सामना बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी मुंबईच्या वानखेडेवर होत आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २९१ धावा केल्या. अफगाणी सलामीवीर इब्राहिम झादरान याने शतक ठोकत १२९ धावांची नाबाद खेळी करत कागांरुंच्या गोलंदाजीला झादरानने चोख प्रत्युत्तर दिले.
तसेच, अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने शेवटच्या क्षणी ३५ धावांची खेळी करत संघाच्या लक्ष्यात भर घातली. त्याने १८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ धावांची खेळी केली. आस्ट्रेलियन गोलंदाजीमध्ये जोश हेजलवूड याने चांगली बॉलिंग करत २ विकेट्स घेतल्या त्यांने ९ षटकांत केवळ ३९ धावा दिल्या तर झाम्पा, मॅक्सवेल आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.