जौनपूरमध्ये ३१० लोकांची ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात घरवापसी! गळ्यातील क्रॉस काढला अन्...

    07-Nov-2023
Total Views |
310-people-from-30-families-who-converted-to-christianity-10-years-ago-do-ghar-wapsi-in-jaunpur

लखनौ : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेली ३६ कुटुंबांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे.या सर्वांची शुद्धी वैदिक विधींद्वारे करण्यात आली. घरवापसी करणाऱ्यांची एकूण संख्या ३१० असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात मुस्लिम परंपरा पाळणाऱ्या इतर ५ कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे. सनातन धर्मात परतलेल्यांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. या सर्वांनी कोणाच्या तरी प्रभावाखाली हिंदू धर्म सोडल्याचे मान्य केले. सामूहिक घरवापसीचा हा कार्यक्रम दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बारसाठी पोलीस स्टेशन हद्दीतील सारसारा गावात हा सामूहिक घरवापसी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'संत रविदास धर्म रक्षा समिती'तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरी परतलेल्या लोकांनी सांगितले की, 10 वर्षांपूर्वी ते राजेंद्र चौहान नावाच्या पाद्री भेटला. या धर्मगुरूच्या प्रभावाखाली हळूहळू गावातील आणि परिसरातील 30 कुटुंबांतील 310 लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यातील बहुतांश कुटुंबे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील होती.

घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त काशीचे संत उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही ही सर्व कुटुंबे त्यांच्या मूळ धर्माशी जोडली गेली आहेत. हे सर्वजण दुर्गापूजेतही सहभागी होत राहिले. विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी सर्वांना गंगाजल आणि हनुमान चालीसा देऊन सनातन धर्माची वैशिष्ट्ये सांगितली. सामुहिक हवनात आयोजक व घरवापसी करणारे सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी हिंदू देवी-देवतांची स्तुती केली.

 
कार्यक्रमादरम्यान, घरवापसी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या गळ्यातील क्रॉस काढून घरातून बायबलला बाहेर काढले. दरम्यान, मुस्लीम धर्माचे पालन करणाऱ्या नाट बिरादरीच्या ५ कुटुंबांनी सनातन धर्मावर विश्वास व्यक्त केला. घरवापसी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असलेल्या यज्ञात या सर्वांनीही सहभाग घेतला आणि यापुढे हिंदू धर्माच्या मूल्यांनुसार जीवन जगण्याचा संकल्प केला.