सार्वजनिक शौचालयाचे 'औरंग्या शौचालय' नामकरण, आक्षेपार्ह बॅनरबाजीला धर्मरक्षक दलाचे प्रत्युत्तर!

    06-Nov-2023
Total Views |
public toilet named Aurangya Toilet

पुणे : पुण्याच्या मंचर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्यामुळे धर्मरक्षक दल संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेकडून या कृतीच्या प्रत्युत्तरात एका सार्वजनिक शौचालयाचे नामकरण 'औरंग्या शौचालय' असे करण्यात आले आहे. तसेच स्टेटस ठेवलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.. दरम्यान यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान संघटनेकडून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात द किंग ऑफ हिंदुस्थान औरंगजेब, अशा आशयाचे बॅनर आणि फलक प्रसारित करण्यात आले होते.त्यामुळे धर्मरक्षक दलाने त्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली. आणि हिंदुस्थानचे किंग छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे दुसरे बॅनर ही त्या ठिकाणी लावण्यात आले. दरम्यान या आक्रमक भुमिकेतून सार्वजनिक शौचालयाचे नामकरण 'औरंग्या शौचालय' असे करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.