ग्रामपंचायत निवडणुक: बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; शिंदेंचा टोला

    06-Nov-2023
Total Views |
 
Shinde
 
 
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवून राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या आमच्या महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीने १३८६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर, मविआला ५०६ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
 
 
 
यावर शिंदेंनी ट्विट करत मविआवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवून राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या आमच्या महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला. भविष्यातही ही विकासाची घोडदौड अशी सुरु राहील आणि जनतेच्या पाठिंब्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांचे आभार मानतो." असं शिंदे म्हणाले.