समर्पण, सेवेशिवाय दुसरी कमाई नाही; बावनकुळे यांचे प्रतिपादन

कोराडी येथे दिव्यागांना कृत्रिम अवयवांचे वाटप

    06-Nov-2023
Total Views |
Chandrashekhar Bawankule At Koradi Public Relations Office

महाराष्ट्र :
एखाद्याला सक्षम करण्यात किंवा त्याला त्याच्या पायावर उभा राहण्यास मदत करण्यात मिळणारे जे समाधान मिळतं ते कशातही नाही, तसेच, सेवेशिवाय दुसरी कमाई कोणतीही नाही, असे प्रतिपादन जागतिक विकालांग दिनाच्या निमित्ताने कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात विकलांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

बावनकुळे म्हणाले, दिव्यांग व अपंग झालेल्या बांधवांना या कृत्रिम अवयवामुळे त्यांच्या जीवनाला गती प्राप्त होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी पुन्हा एकदा निर्माण होणार असून ते पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सर्वार्थाने स्वतःच्या पायावर उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शुभम आणि रमेश यांना कृत्रिम पाय मिळाल्याने त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक कामे सुकर होणार असल्याची भावना व्यक्त करत बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी रमेश ढगे व शुभम राऊत यांना कृत्रिम पाय, चंद्रकुमार पारधी यांना कर्णयंत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी समित स्पोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक साजीद शेख व आशिष मेरखेड यांच्यासह महेश बोंडे यांनी विशेष प्रयत्न केले.