मुंबई : मध्य रेल्वेवर शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणा, रेल्वेमार्ग, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी फिरायचा प्लान बनविणाऱ्यांनो सावधान कारण, तुम्हाला मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो.
मध्ये रेल्वेवर कुठून ते कुठपर्यंत असणार आहे मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर माटुंगा ते भायखळादरम्यान मध्यरात्री १२:३५ ते पहाटे ०४:३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सेंट्रल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद रेल्वे मार्ग ५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार/रविवार रात्री) रोजी मध्यरात्री १२:३५ ते पहाटे ४:३५ पर्यंत बंद राहतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हार्बर रेल्वे
हार्बर लाइनवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११:१० ते सायंकाळी ०४:१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ दरम्यान पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०:१६ ते सायंकाळी ३ :४७ पर्यंत रेल्वेसेवा बंद असणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.