प्रोटियन इ गव्हरमेंट टेक्नॉलॉजी लिमिटेडने अँकर गुंतवणूकदारांकडून 'इतके' कोटी जमवले

    04-Nov-2023
Total Views |

Protean
 
प्रोटियन इ गव्हरमेंट टेक्नॉलॉजी लिमिटेडने अँकर गुंतवणूकदारांकडून 'इतके' कोटी जमवले
 
मुंबई: Protean eGov Technologies Limited म्हणजेच पूर्वाश्रमीच्या एनएसडीएल इ गव्हरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ने अँकर गुंतवणूकदारांकडून (Institutional Investors) कडून १४३ कोटी जमवले आहेत. ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ होणार आहे.आयपीओ पूर्वीच १४३ कोटी एंजल इनव्हेसमेंट प्राप्त केल्याने १८.१२ लाख कोटींचे इक्विटी शेअर १८ फंडसला वाटप केले असून प्रत्येकी इक्विटी शेअरची अप्पर प्राईज बँड किंमत ७९२ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.
 
बीएसीवरील माहितीप्रमाणे १४३.४२ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदाराकडून मिळाली आहे. त्यामध्ये Society General, SBI General Insurance Company, Aditya Birla Sun Life Insurance Company, LIC Mutual Fund, Baroda BNP Paribas Mutual Fund हे इन्स्टिट्युटशनल गुंतवणूकदारांनी गूंतवणूक केली आहे. कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) हे १.२८ कोटींहून कमी करत ६१.९१ लाख इक्विटी शेअर्स ठेवण्यात आले आहेत.
 
OFS मध्ये IIFL Special Opportunities, NSE Investments, Unit Trust of India Administrator, HDFC Bank, Deutshe Bank, Punjab National Bank, Union Bank of India इत्यादी ऑफरिंग खेळाडू आहेत.
 
ICICI Securities, Equirus Capital, IIFL Securities, Nomura Financial Advisiory and Securities ( India) हे भागभांडवल वाटपासाठी बुकिंग मॅनेजर आहेत.