अयोध्यानगरीत ५ नोव्हेंबरला 'अक्षत पूजा'

    03-Nov-2023
Total Views |
 ram mandir
 
लखनऊ : अयोध्येत राम मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्याआधी ५ नोव्हेंबरला एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिरात ५ नोव्हेंबरला अक्षत पूजा होणार आहे. या अक्षत पूजेमध्ये १०० क्विंटल तांदूळ, एक क्विंटल हळद आणि एक क्विंटल देशी तूपाची पूजा केली जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे.
 
सनातन धर्माच्या प्राचीन परंपरेनुसार अक्षतांची पूजा केली जाते. संपूर्ण तांदळाला अक्षत म्हणतात. हिंदू धर्मात पूजेदरम्यान देवाला अक्षत अर्पण केले जाते. अयोध्येत होणाऱ्या अक्षत पूजेदरम्यान संपूर्ण तांदळात हळद आणि देशी तूप मिसळले जाणार आहे. त्यानंतर अक्षतला पितळी कलशात ठेवण्यात येईल. हे सर्व कलश ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पूजेदरम्यान श्री राम दरबारात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर मंत्रोच्चारात पूजा केली जाईल. पूजेनंतर हे अक्षत देशभरातील राम भक्तांमध्ये वाटले जाणार आहेत.